हिम्मत

Started by शिवाजी सांगळे, June 20, 2019, 01:45:24 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हिम्मत

संपली ती गोष्ट, नवीन सुरवात करु
भरल्या ढगातून, पाऊस झाला सुरु

निसर्गाने साथ देता, नेक कष्ट करु
दुःख दारिद्रय सारं, पुन्हा दूर सारु

फुलवूया शिवार, नांगर हाती धरुन
येईल पिक जोमान, रान हिरवं करु

पिकवायची शेती, कमवायचं धान
शिकवू पोरां, मुखी दोन घास चारु

कसायची जमीन, रे बळीराजा यंदा
आत्महत्या नको, हिम्मत मनी धरु

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९