खेळ

Started by Sagar salvi, June 21, 2019, 10:11:42 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi



मनाला खेळ कळला नाही !

आखलेल्या रेषे पलीकडे
मन ही माझे जात आहे,
स्वप्नात चालणे बंद कर
मी सांगितलं ती रात आहे.

निवडलं फक्त मला प्रेमाने
कोणी म्हणालं क्या बात आहे,
प्रेम नावाचं चिटकलं धुकं
मन म्हणाल ती कात आहे.

स्पर्श केला हृदयाला माझ्या
मला वाटलं हात आहे,
ठोक्यांशिवाय लागले झटके
तेंव्हा कळलं लात आहे.

राणी आली जवळ माझ्या
हिरवळ हिरवी पात आहे,
बुद्धीबळाचा खेळ होता
जवळीक साधून मात आहे.


सागर साळवी.
8483889983