औषध

Started by Sagar salvi, June 22, 2019, 07:15:09 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

कोणाकडेही न बोलावे असे व्यसन
लागले तुला पाहता पाहता,
औषधाने सुद्धा गुण येतं न्हवता
थकले ते माझ्याबरोबर राहता राहता.

पाण्यात मिसळवून पाहिले औषधाला
रंग त्याचा बदलला नाही,
बुडाला तो रंगीत पाण्यामध्ये सुद्धा
खरा रंग आढळला नाही.

पाठवले औषध आत
मनाचा पत्ता लिहिला त्यावर,
औषधही तुझ्या प्रेमात वेंधळे
विरघळले ते ही पोटात गेल्यावर.