माझ्या नव्या प्रेमाची कहाणी....

Started by Mahesh Thite, June 22, 2019, 08:21:08 PM

Previous topic - Next topic

Mahesh Thite

           माझ्या नव्या प्रेमाची कहाणी...

पहिलीनं कटवलं तव्हा एकटं एकटं वाटलं,
ऐका हो ऐका मी कसं दुसरीला पटवलं।।

दररोज कॉलेजला ती बसने यायची जायची
बसमधल्या गर्दीने तीची गुसमट व्हायची।
त्यासाठी मी आधीच एक सीट पकडून ठेवायची,
ती आल्यावर तिला बसायला जागा द्यायची।
तिच्यासाठी मी रूमवर राहणं सोडलं,
ऐका हो ऐका मी कसं दुसरीला पटवलं।।

लेक्चर अगोदर ती एक तास कॉलेजला यायची,
तिच्यासोबत तिच्या मैत्रिणींची फौज असायची।
ही सारी फौज घेऊन ती कॅन्टीनला बसायची,
तिला बघण्यासाठी माझी घालमेल व्हायची।
तिच्या नादापाई माझं कॅन्टीनचं बिल वाढलं,
ऐका हो ऐका मी कसं दुसरीला पटवलं।।

पेपरला बसायला ती माझ्यामागेच असायची,
मी पेपर लिहून तिला दाखवणं, अशी दुहेरी कसरत चालायची।
तिनं आणलेल्या चिट्ठीतून उत्तराची ओळ, मीच सापडून द्यायची,
शिवाय एखादी पुरवणी तिला लिहून द्यायची।
तिला पास करता करता माझंच बॅकला राहिलं
ऐका हो ऐका मी कसं दुसरीला पटवलं।।

दिवसेंदिवस ती मला जरा जास्तच आवडायला लागली,
एक दिवस मग तिला एकटीलाच गाठली।
गुलाबाच्या फुलासोबत एक कॅटबरी दिली,
माझ्या मनातली भावना तिच्यासमोर बोलून दाखवली।
तिच्या गालातलं हसू सारं काही बोलून गेलं,
ऐका हो ऐका मी कसं दुसरीला पटवलं।।

                                 -- महेश थिटे,
                                     अहमदनगर