नेमकं

Started by Sagar salvi, June 23, 2019, 07:41:18 AM

Previous topic - Next topic

Sagar salvi

आता तरी सांग
तुझ्या मनात नेमकं काय होतं,
तुझं लांबून हात हलवणं
बोलावणं होतं की बाय होतं.

मला वाटल माझ्यासाठी
लांबून हाय फाय होतं,
तुझं लांबून हात हलवणं
मागच्यासाठी ट्राय होतं.

तुझं लांबून हसणं जणु
मच्छी पापलेट फ्राय होतं,
थोडा रस्सा चालला असता
बघणं नुसतं ड्राय होतं.

मानेने नुसती खूण केली
उजवं डावं नाय होतं,
माझ्या गळ्यात पट्टा न्हवता
काय म्हणतात ते टाय होतं.