औकाद माझी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 26, 2019, 07:02:02 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.औकाद माझी*

औकाद माझी ती आज कळते मला ही
फास होऊन गळ्यास चळते मला ही

तू आज सोडले मला अन गाठ सुटली
सुटल्यावर विनाकारण वगळते मला ही

लाख प्रश्न असतात मेंदूत माझ्या सलणारे
सलतांना विचार गर्तेत ढवळते मला ही

तू होतीस अशी की तो देव पळून गेला
पाहून सारे जगात का मिसळते मला ही

सापडत असतो नेहमीच मी fb वर तिला
न शोधता का स्वप्नांत कवळते मला ही

आज पाहिलं मी पण आठवून तिला
का सरणावर आज ती उजळते मला ही

शेवटचं भेटशील मला आशा होती माझी
कळले नंतर राख घेऊन उधळते मला ही

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).मो.९६३७०४०९००.अहमदनगरमाझी