दुष्काळ

Started by wadikar durga, June 26, 2019, 01:33:20 PM

Previous topic - Next topic

wadikar durga

ढगांचा गडगडाट कुठे पळाला
पाऊस हरवून गेला
तडे गेले धरणीला
डोळा आमचा ओला आहे

स्वप्नातील हिरवे पीक
जीवनात आलेच नाही
कोरड्या आभाळाने
सुख आमचे वाहून नेले

कष्ठाचं पीक करपून गेलं
भुकेची आग पोटामध्ये
माझ्या मोडक्या संसाराला
सुकलेली बाग का आहे?


जगूण मरावं कि मरून जगावं
खूप मोठा पेच आहे
गाळला कितीही घाम तरी
दरवर्षी आमच्या वाटी दुष्काळच आहे

वाटा  गेल्या अंधारून
दिशाहीन मन आहे
डोळ्या समोर आज
फक्त दोरीचा गळफास आहे

@दुर्गा 
Mo.No.