डोळे झाकून हसलेलं पुस्तक

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 29, 2019, 06:48:57 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.डोळे झाकून हसलेलं पुस्तक*

बघ ना कसा पाऊस बरसतोय
अगणित स्पंदनासाठी तरसतोय
तुझ्या मिठीचा अन माझ्या मिठीचा
एक एक भाग आज गरजतोय
तू येशील सगळं काही ठीक होईल
का कोणास ठाऊक तुझं नसलेलं प्रेम
अन माझं डोळे झाकून हसलेलं पुस्तकं
काळजाच्या कप्प्यात होणारी दस्तकं
श्वासापासून ओठापर्यंत
अडकलेले शब्द
झाले होते स्तब्ध
काळजाचा आकांड तांडव
तू नसतांनाही सजलेला मांडव
गप्प झाला नाव माझे खोडल्या पासून

सुगंध होऊन येणारा मी कधी
ओळखल नाही तू या आधी
वात विझून गेली तिरस्कार पाहून
कळलं तेव्हाच सारं काही
उपयोग होणार नाही जवळ राहून
भ्रमराचे उड्डाण मकरंद
टिपण्यासाठी थांबले
त्याचेच आवडते फुल
आज तू इथे टांगले
गुदमरून जीव गेला आहे त्याचा
तुझ्यास्पर्शाचा काही एक सबंध नसतांना
कारण त्याला हवी होती मोकळीक
कधी हवी हवीशी वाटणारी जवळीक

हं ..आता कुठं ते मिळणार आहे
गप्प बसून सारं मी गिळणार आहे
तुझा तिरस्कार तुझा अहंकार बस्स......
मरणाने फक्त आता दस्तकं द्यावी
खोटी प्रीत नत मस्तकं व्हावी

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Rasdonly


Satishtaral

वाचाव्यात तू माझ्या कविता
त्यातून कळाव्यात माझ्या भावना...
अंतरीचा दाह शमवू कसा गं,
समोर येऊन तूच जरा सांगना...

पाहावे वाटते खूप तुला पण
तुझी एकही झलक मला मिळेना...
का गुंतलो तुझ्यात मी एवढा,
माझेच मला कसं काही कळेना....

तुझी सवय एवढी झाली मला
तुझ्याविना मला आता जगवेना...
का अशी छळतेस मला तू,
का माझी खुळी प्रीत तुला उमगेना...

ये आता खूप झाले लपंडाव
खूप शोधले, तू मला सापडेना...
तुझ्या मिठीत मरायचे म्हणून
जीवाला हि हा देह सोडवेना...