गझल

Started by श्री. प्रकाश साळवी, July 05, 2019, 11:19:52 AM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

नाटक जगण्याचे कशाला करू मी !
तमाशा जीवनाचा कशाला करू मी !
**
किती बहाणे कसे साहू जीवना रे
जगू कि मरू उगा कशाला करू मी !
**
प्रेम काय असते तुला काय ठावे
तु लैला मी मजनू कशाला करू मी !
**
नेहमीच चुकतो अंदाज पावसाचा
घोषा पावसाचा कशाला करू मी !
**
घालून जगतो रोज खोटे मुखवटे
खेळ गारूड्याचा कशाला करू मी !
**
किती गोड नाम घेऊ तुझे विठ्ठला
मनाला विकारी कशाला करू मी !
**
सांगावे भल्याचे तयांना तर बुरे वाटते
वृथा तोंडाची बडबड कशाला करू मी !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४