पुन्हा एकदा ...!!

Started by श्री. प्रकाश साळवी, July 05, 2019, 11:23:17 AM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा
आसवांनी थाटले आयुष्याला पुन्हा एकदा
**
होते भरकटलेले आयुष्य माझे कधीकाळी
थाटले नव्याने तुजसवे असे पुन्हा एकदा
**
गंध पारीजातकाचा ओसंडून वाहात आहे
वाटे तुझ्या गजऱ्यात फुल व्हावे पुन्हा एकदा
**
प्राशिते नशा तुला कि तु प्राशितो नशेला
रिचवून बघ एक प्याला नशेचा पुन्हा एकदा
**
मागे वळून पाहिले तिने अन् मी घायाळ झालो
तिच्या नजरेत घायाळ राहू दे पुन्हा एकदा
**
तुझ्या दर्शनाची लागली ओढ रे विठ्ठला
कधी देशील दर्शन या नयना पुन्हा एकदा
**
दो बूंद जिंदगी के आज आणि उद्याही
पोलिओमुक्त करू या भारत पुन्हा एकदा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४