गुन्हेगार मी जाहीर आहे !!

Started by श्री. प्रकाश साळवी, July 05, 2019, 11:27:22 AM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

गुन्हेगार मी जाहीर आहे
चोरी करण्यात माहीर आहे
**
हसा लेको कवितांना माझ्या
तरीही मी म्हणेन शाहीर आहे
**
ठेवले डांबून! खरे बोललो मी
खरा चोर जगजाहीर आहे
**
फसवशील तु जगाला ! मनाचे काय?
खरे तर हा गुन्हा गंभीर आहे
**
मला निकड जेव्हढी; पुरेसे आहे
मन:शांती ही खरी जागीर (जहागीर)आहे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा.९१५८२५६०५४