बाकी आहे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 05, 2019, 12:12:58 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.बाकी आहे*

देहात माझ्या अजून प्राण बाकी आहे
समाजात माझा अजून मान बाकी आहे 

सोडले होते यांनी मला भिकारी म्हणून
त्यांनी दिलेले अजून दान बाकी आहे

विसरलो नाही एक एक चटका हृदयाचा
दगा दिलास ती अजून घाण बाकी आहे

सोडलं आहे एकटं झुरणं आता जरासं
झुरल्या नंतरही अजून भान बाकी आहे

का मुजोरी केलीस तू पावसा मनावर
अपूर्ण कवितेचे अजून पान बाकी आहे

आसवांचे पेरले होते स्वप्नं नव्याने मी
ठोकरले जरी तू अजून शान बाकी आहे

सरण माझे पेटले तिरस्काराने तुझ्या
जाळलेले ते अजून रान बाकी आहे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर