पावसाची सर ...

Started by Sachin Mhetre, July 08, 2019, 03:01:56 PM

Previous topic - Next topic

Sachin Mhetre

पावसाची सर ... ०८-जून-२०१९ स. ७:००


क्षितीजाच्या पार, उतरली ओली सर
येणे तुझे धरेवर, कधी कसे लपणार ।।१।।

मंद मंद हा वारा, धुंद गंधासवे आला
छंद तुझाच हा सारा, तनामनास जडला ।।२।।

चमकली वीज वर, तुझ्या भाळीची बिंदिया
पावसा संगे सर, घरी आली हो नांदाया ।।३।।

लक्ष्मीच्या पाऊलांनी, घरीदारी सर आली
थेंब थेंब झिरपूनी, धरतीही चिंब झाली ।।४।।

धरतीचा उष्ण श्वास, तुझ्या प्रेमाचा सुवास
सरीचा कृष्ण पाऊस, दोघां मिलनं हे खास ।।५।।     


सचिन म्हेत्रे, पुणे
(मो. ९४२०२१२८३८)