9वर्ष च्या नवरंगी आठवणी

Started by RoshniMahajan, July 10, 2019, 09:59:14 AM

Previous topic - Next topic

RoshniMahajan

आमच्या लग्नाच्या नवव्या वाढदिवसाला मी लिहलेली कविता...

*नऊवर्षाच्या नवरंगी आठवणी*

चॅटिंग नाही ,डेटिंग नाही
         कधी कोणती सेटिंग नाही🙆‍♀
तरी तुझं माझं पाहिलं प्रेम
         मी कधीच विसरणार नाही😍
पण लपून छपून बोलताना
        आपल्याला *नाकीनऊ* आलं😄
अहो बघा ना आपल्या
         लग्नाला *नऊवर्षे* झालं💑

सात जन्माची गाठ बांधून
          माझ्या घरी मी आली👸
मनात एकाच हुरहुर होती
          अजून कॉलेज ची 2 वर्ष राहिली😌
पण तुमच्यापासून दूर राहण
           खूप *नाकीनऊ* आलं😉
अहो बघा ना आपल्या
          लग्नाला *नऊवर्षे* झालं💑

नवा संसार,नवी नौकरी करत 👩‍🏫
          नव्या घरात रमली🤗
नात्यात नवे रंग भरण्यासाठी
          नन्ही परी हळूच आली👨‍👩‍👧
पण नवी जबाबदारी सांभाळताना
          सर्वांच्या *नाकीनऊ* आलं🙄
अहो बघा ना आपल्या
         लग्नाला *नऊवर्षे* झालं💑

तुझं माझं न करता
         सगळ्यांनाच आपलं मानलं😘
माहेर असो वा सासर
         नात्याशी नात जोडून ठेवलं🤝🏻
पण मन सगळ्यांचे जपताना
         माझ्या *नाकीनऊ* आलं😇
अहो बघा ना आपल्या
          लग्नाला *नऊवर्षे* झालं💑

तू आणि मी दोन टोकं ,आपली
        आवड जुळता जुळतं नाही🙃
तरी आपल्याला एकमेकविना
       मुळीच का रे करमत नाही🤭
पण तुला हे पटवतांना
       माझ्या *नाकीनऊ* आलं😇
अहो बघा ना आपल्या
        लग्नाला *नऊवर्षे* झालं💑

सूख दुःख चा जमवत मेळ
         खेळतोय संसाराचा खेळ😊
तू फक्त साथ दे मला
         निभावून नेऊ प्रत्येक वेळ😎
पण स्वप्नाची वास्तवाची सांगड         
       घालतांना *नाकीनऊ* आलं😇
अहो बघा ना आपल्या
         लग्नाला *नऊवर्षे* झालं💑


- रोशनी महाजन,
  पुणे.