हेतू

Started by शिवाजी सांगळे, July 14, 2019, 01:25:57 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हेतू

टाळणे सोपे मला विसरणे कठीण आहे
सांगू कसा पुरताच हेतू तुझा क्षीण आहे

रात्रं दिवस येथल्या शेतात राबतो बळी 
बिनधास्त दलालांची शहरात चैन आहे

कसले उपाय अन् योजना त्या कशाला
तोऱ्यातली सत्ता मिचकावित नैन आहे

मंद प्रकाशी दालनातल्या टेबलावरती
कर्जमाफी कागदावर नाचरा पेन आहे

भाव खातोय वाऱ्यावरी झुलता मनोरा 
घेऊन माल नशेचा सार्वत्रिक मौन आहे

मी कोण येथला आभारास पात्र येवढा
दरबारात सरस्वतीच्या मात्र लीन आहे

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९