घाव

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 17, 2019, 12:09:08 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.घाव*

अकाल माझ्या दारी पडला का
तू दिलेला घाव उरी दडला का

तू असो वा नसो
मी मात्र असतोच
कालच्या कवितेच्या
ओळीत हसतोच

सोबती माझा आज नडला का
तू दिलेला घाव उरी दडला का

सुरुवात तुझ्यापाशी
रोज घुटमळते येऊन
सुचाव काय नाव ते
कविता जरी पूर्ण होऊन

कवितेत रोष तुझा भिडला का
तू दिलेला घाव उरी दडला का

तुझा अभिप्राय ही
धुरकट होऊन गेला
काळजाला निर्वाणीचा
इशारा देऊन गेला

प्रेमात असला प्रकार घडला का
तू दिलेला घाव उरी दडला का

वाद तुझा माझा
कधी मिटला नाही
शाप असा भेटला
कधी फिटला नाही

मयत माझी पाहून गाव रडला का
तू दिलेला घाव उरी दडला का

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर