गेलीस दूर कळला एकट्याचा अर्थ ….

Started by Mandar Bapat, July 18, 2019, 11:51:08 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

गेलीस दूर  कळला एकट्याचा अर्थ
तेव्हा होता मात्र तो तितकाच निरर्थ

काही नसतं  हातात जेव्हा कोणी जातं
खेळाया  पुरे असत गवताच पातं
जे नाही म्हणतो तेच का मन करतं
गेलीस दूर  कळला एकट्याचा अर्थ ....

नसत कोणीच  आपल्या आधाराला
भिडतच  राहते नजर लाटेला
ओले थेंब अखेरीस मनास तारत
गेलीस दूर  कळला एकट्याचा अर्थ ....

एकटे तारे एकटा  चंद्र एकटा  मी
मृगजळा परी असूनही  नसतो मी 
रहाया  एकटे आता मनास अखरत
गेलीस दूर  कळला एकट्याचा अर्थ ....

                                                      ... मंदार बापट