तुला मी विसरणार कसा

Started by Devanand Pangul, July 19, 2019, 08:07:53 PM

Previous topic - Next topic

Devanand Pangul

तुला मी विसरणार कसा

भेट आपुली निराळी सागरात बुडाली नाव
माझ्या मनात बसलेले तुझ्या प्रितीचे एक गाव
पाहिले ज्या क्षणी तुला जीव झाला वेडापिसा
सांग ना ग  तुला मी विसरणार कसा

ओठात माझ्या तुझे नाव श्वासात तू बसली
धुंद झाल्या चारही दिशा जेव्हा तू हसली
उमटला हृदयावरती माझ्या तुझ्या पावलांचा ठसा
सांग ना ग तुला मी विसरणार कसा

मधुर तुझ्या वाणीचे वेध लागले अधीर कानाला
मन रडतंय तुझ्यासाठी कसा समजावू या मनाला
स्वप्न घेऊनी तुझे नयनांनी घेतला तुझा वसा
सांग ना ग तुला मी विसरणार कसा

काय तुझ्या मनात कसे कळणार मला
होशील का तू माझी साद घालतो तुला
हाक देऊनी तुला थकला आज माझा घसा
सांग ना ग तुला मी विसरणार कसा
                     
                        कवी  -  देव
                         (देवानंद पांगुळ)