तुझ्यापर्यंत

Started by Dnyaneshwar Musale, July 23, 2019, 11:38:10 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

शब्दांची ओंजळ करून
साठवुन ठेवल्यात साऱ्या कविता,
वाटतं कधी सोडुन द्याव्यात
ओंझोळीतून
तुझ्या ओंजळीत,
जमलंच तर वाचशील,
वाहत जात मी ही
पोहचेल कवितेतून तुझ्यापर्यंत
फक्त तुही ओंझोळीत
सारं काही साठवुन ठेवं,
म्हंजी मला भीती नाही
कवितेत पुन्हा हरवण्याची.