नाही आता

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 24, 2019, 11:07:38 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.नाही आता*

मीचं कोणाशी बोलत नाही आता
कोणापुढे राज मनाचे खोलत नाही आता

दुःखाने जिंदगी मढवली जरी आहे
सोप्पे असणारे दुःख सोलत नाही आता

सांगायचं खूप असतं मनातल कविते
खोडलेले शब्द ते जोडत नाही आता

तू गेलीस जगणं अवघड झालं आहे माझं
अवघड जगतांना मी डोलत नाही आता

विठ्ठला सुखी संसार माझा पहावला नाही
तुझ्या शापाने मी पण मोडत नाही आता

दिले जरी शिव्या शाप प्रेमाला माझ्या
शिव्या भोवताली रोवत नाही आता

मेलो जरी असलो अंतकरणातून मी
देहावर फुले कोण ओवत नाही आता

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर