आला पाऊस

Started by शिवाजी सांगळे, July 26, 2019, 05:42:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आला पाऊस

आला आला पाऊस आला
चला मुलांनो भिजायला चला...धृ

झर झर कोसळत्या धारा
झाडा फुलांशी खेळे वारा
जमीन ओली छतही ओले
चिंब सगळा परिसर झाला...१
आला आला पाऊस आला

विजा खेळती ढगां संगती
इकडे तिकडे स्वैर दौडती
पक्षी निजले घरट्या मधले
थंडथंड जेव्हा वारा सुटला...२
आला आला पाऊस आला

भिजा खेळता मस्ती करा
खेळ खेळता ध्यानी धरा
असते विज मोठा खतरा
जाऊ नका तिच्या वाटेला...३
आला आला पाऊस आला
चला मुलांनो भिजायला चला

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९