अतूट प्रेम आमचं..

Started by Akash Borkar, July 27, 2019, 02:23:19 AM

Previous topic - Next topic

Akash Borkar

तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण कधी संपूच नये असे वाटे..
दूर जाण्याच्या विचाराने नकळत डोळ्यात पाणी साठे.

पाहतो जेव्हा मी फुले ,खूप येते मला तुझी आठवण..
न संपणारी आहे आपल्या प्रेमाच्या क्षणांची साठवण...

होतीस जेव्हा तु सोबती, वाटत होतं सगळं जग भारी..
दूर गेल्यापासून तू,राहिला नाही जगण्याला अर्थकाही..

आठवून तूझ्यासोबतच हसणं,रडणं आणि उगीचच रुसणं ....
आता वाटतं तुझा हात हातात घेऊन असावं माझं जगणं...

वाईट परिस्थितीत हि तू शिकवलं मनमोकळ हसायला....
तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर आवडायचं मला  रागवायला....

जरी आहोत आत्ता आपण  लोकांसाठी  वेगळे..
पण माहित नाही जगाला ,प्रेमात आपण किती खुळे..
खूप आहेत तुझ्या आठवणी,ह्रदयात माझ्या साठवूणी..
कितीही मांडल्या शब्दांत तरी आहेत त्या कमी....♥️

For you ♡Nkte♡---------------------By Krishna.(आकाश बोरकर).