दान तुझ मिळू दे

Started by MutteringMind, July 28, 2019, 09:48:16 PM

Previous topic - Next topic

MutteringMind

ओंजळीत घेउनी भावना
शब्दांना तुला बोलू दे
पापण्याआड दडलेल्या आसवांना
तुझ्या प्रेमात वाहू दे

उजळू दे आसमंत सारा
पुन्हा चंद्रास हरू दे
तुझ्या नितळ प्रेमाचा
प्रकाश अंगणी सांडू दे

कुजबुजल्या दिशा दाही
प्रेम तुझं मिळू दे
आयुष्याची कोरी पाने
तुझ्या शाईने सजू दे

अजाण नभास त्या
गंध मातीचा कळू दे
पसरली झोळी त्याच्यापुढ
दान तुझ मिळू दे