भिकारी

Started by sandip jagtap, July 28, 2019, 10:14:36 PM

Previous topic - Next topic

sandip jagtap

भिकारी

काय नशिबीही आले
आली हातामधे वाटी
घेतो पाठीवर काठी
सर्व काही पोटासाठी

नाही आई बापाचा पत्ता
नाही घर मालमत्ता
काय पडतो फरक
आली कोणाचीही सत्ता

भीक मागुनीया पीळ
आतड्याच्या या सोडतो
पुढच्या जन्मी नको पोट
देवा हातमी जोडतो

हात करताना पुढ
जीव तीळ तीळ तुटे
भीडे नजरेला नजर
बांध आसवांचा सुटे

झोपताना रोज आसे
उद्याचीही आस
ताटामध्ये निघो रोज
एकतरी केस

रस्त्यांनी पोर फीरे
रोज सुट आणि बुट
आमचा एकच सदरा
त्याला रोज नवी गाठ

देवा दिलास जन्म
नशीब कार लिहिल नाय
सांग झाली काय चुक
पुन्हा करणार नाय

---  Sandip s. Jagtap

my blog - http://sandipsjagtap.blogspot.in