मी पाहिलंय तिला

Started by Dnyaneshwar Musale, July 30, 2019, 12:11:56 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

मी पाहलय तिला
डोळ्यांच्या काचळ्या होई पर्यंत रडताना,
अनं मुठीत जीवधरून साकारलेल्या
स्वप्नांचा चुरा होईनही
गट्ट पाय रोवुन पुन्हा लढताना.

मी पाहिलंय तिला
बोथटलेल्या आयुष्याला धार लावुन
बुरसटलेल्या रुढींवर घाव घालताना,
असह्य वेदनेच्या वाटेवर चालताना,
अनं हसू दे मला जरा म्हणत दुःख झेलताना.


मी पाहिलंय तिला
झरा होऊन वाहताना,
अनं तान्ह्यासाठी
कुटकाभर भाकरीवरच उपाशी राहताना.


मी पाहिलंय तिला
घरासाठी आयुष्यभर झुरताना,
अनं हसत हसत
भाळावर नवऱ्यासाठी आयुष्य कोरताना.

खरच
पाहतोय तिला,
नाती शब्दांत सांधताना,
अनं घर करून
लक्ष्मी होऊन नांदताना.