।।चहा।।

Started by Tejaswi Mohite, August 02, 2019, 09:54:00 PM

Previous topic - Next topic

Tejaswi Mohite

।।.. चहा..।।


चहा म्हणजे काय तर एक उत्साह असतो..
आमच्यासाठी दिवसाची सुरुवात असतो....

चहा कसाही प्यावा..
बशीतून फुरर करत प्यावा..
नाहीतर दिवसभर घोट घोट प्यावा...
पण एकदा तरी नक्की घ्यावा...

आनंदी असताना चहा प्यावा..
न दुःखात तर प्यावाच प्यावा..
न ज्यांना आवडत नाही ..
त्यांना तर दाखवून चहा प्यावा..

चहा केवळ पेय नसून...
चहावेड्यांसाठी एक अमृतच असतं..
कोणीही काहीही बोलल तरी..
आमचं हे व्यसन सुटत नसतं...

                               --  तेजस्वी मोहिते