मैत्री

Started by Dnyaneshwar Musale, August 04, 2019, 02:40:28 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

खर तर दोस्ता तु
सोबतीस म्हणुन
चालायला, बोलायला शिकलो,
खेळाच्या मैदानातही
मी तुझ्यामुळे टिकलो.

मित्रा
मनाच्या गाभाऱ्यातला ओलावा
पहिल्यांदा तुच बनला,
तु फक्त लढ, मी आहे म्हणुन
दोस्तीचा धागा ही तुच विणला.

कुणी बोललं तु हसतो कधी
तर माझं उत्तर असतं,
जिवाभावाचे दोस्त सोबत असले की मग,
कारण तेच तर कट्ट्यावर बसुन
थट्टा करत बिनदास्त फिरवत असतात जग.

फिरताना कधी फिरण्याचा
आनंद नसतो,
तर फिरताना मित्र सोबत असण्याचा आनंद जास्त असतो,
त्याच मित्रामुळे तर  मी एकटा
कधीच नसतो.

चहाची टपरीवर जाणं तर तुझ्याशिवाय
ओसाड वाटतं,
भांडण जरी झाली
तरी मैत्रीचं नातं अतुट असतं.


मित्रा तुला थँक्स वैगरे म्हटलं
तर खुपच तुला राग येतो,
कारण मित्र एका रक्ताचा नसला
तरी समजतच नाही तो आपला
भाऊ कधी बनुन जातो.

मित्रा खरचं तुला मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.