कशाला

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 07, 2019, 11:26:59 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.कशाला*

रूपावर तुझ्या भाळायचे कशाला
भेटणार आहेस तर टाळायचे कशाला

माहीत आहे मला तू वेडी आहेस प्रेमाची
प्रेम आहे खरे तर उधळायचे कशाला

विश्वास आहे मला तू सोडणार नाही
साक्षीला प्रेम पत्र ते जाळायचे कशाला

जखम आहे खोलवर तुझ्या दुःखाची
भरलेल्या जखमेला साळायचे कशाला

आता अश्रूंच्या सरी सोबतीला असतात
आहेस तू त्यात तर गाळायचे कशाला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर