पाऊस आला भिजवून तुजला...!

Started by Sachin Mhetre, August 07, 2019, 04:45:00 PM

Previous topic - Next topic

Sachin Mhetre

पाऊस आला भिजवून तुजला...!                      दि. ०५-ऑगस्ट-२०१९ स. ५:३०


पाऊस आला भिजवून तुजला
केसातूनी थेंब तनूवरी सरकला
मोती थिजवीले तुझीया गाला 
पाऊस आला भिजवून तुजला ।।१।।

वसनेही ओली बिलगली देहाला
मी ही वसन व्हावे वाटे मनाला
लपेटून घेशील चिंब ओल्या तनूला
पाऊस आला भिजवून तुजला ।।२।।

गोड अधरी थेंब एक विसावला
वाटे धावूनी मी तो सावरावा
तुझ्या उष्ण श्वासात, श्वास माझा मिळावा
पाऊस आला भिजवून तुजला ।।३।।

कटी भोवती हात हलकेच गुंफून
अलगद जवळी तुजं घ्यावे ओढून
ओल्या सरींसवे बघं श्रावण आला
पाऊस आला भिजवून तुजला ।।४।।     


सचिन म्हेत्रे, पुणे
(मो. ९४२०२१२८३८)