तु

Started by Pradnya Ahire, August 10, 2019, 12:24:25 AM

Previous topic - Next topic

Pradnya Ahire

माझ्या जीवनाचा अर्थ तु, 

माझ्या प्रत्येक श्वासात तु,

तुझ्या आठवणींत रमायला मला खूप आवडते,

तुझ्याशिवाय माझं मन दुसरीकडे कुठ रमतचं नाही !


माझ्या स्वप्नांत तु, 

माझ्या सत्यात तु,

तुझ्या बरोबर स्वप्न बघायला मला खूप आवडते,

तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर मला स्वप्न बघायचंच नाही !


माझ्या हृदयात तु,

कधीही न सुटणारी गाठ तु,

मला ही गाठ बांधायला खूप आवडते,

मला ही गाठ आयुष्यभर सोडायचीच नाही !



माझ्या कवितेंचा अर्थ तु,

माझ्या प्रेमाचा विषय तु,

तुझ्याविषयी मला बोलायला खूप आवडते,

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात दुसरा विषयचं  नाही !



माझ्या प्रत्येक क्षणात तु,

माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत तु,

तुझ्यासोबत मला जीवन जगायला खूप आवडते,

तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणासोबत जीवन जगायचंच नाही !


प्रज्ञा आहिरे
https://www.mypoem.club


dattarajp