पावसा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 12, 2019, 10:31:42 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.पावसा*

पावसा थांबव खेळ
देह नाशवंत झाला
घेऊदे मोकळा श्वास
आता मागणे देवाला

खूप पीडा दिलीस तू
काढ पाण्याचा पहारा
दे आधार जरासा
संसार झाला देव्हारा

देव ठेवला नाही तू
पुजायला मंदिरात
महाराष्ट्राचे जवान
त्यांचे घर उदरात

काय पाप झाले
दिले आम्हा ऐसें फळ
सारं उध्वस्त झालं
आता कसं येईल बळ

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर