सहवास तुझा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 15, 2019, 06:12:14 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.सहवास तुझा*

कोणाला पाहिले अन कोण भेटले मला
स्वप्नांच्या दुनियेतल पाखरू खेटले मला

हात हाती तुझाच होता जणू काही
अन पकडता दुसराच त्यांनी रेटले मला

आरशातली दुनिया दुसरी होती माझी
आठवणींचे कागद पाहून पेटले मला

असंच होतं गेलं तुझा सहवास असतांना
सहवास तुझा हा जीवना बेतले मला

तू गेलीस तेव्हा सारं विरांन झालं होतं
रक्तातला होतो म्हणून घरात घेतले मला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर