राग

Started by शिवाजी सांगळे, August 20, 2019, 12:43:49 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

राग

सुखावणारा काळ असतो रागाला
आनंद देणारा ताल असतो रागाला
दिशा देणारा सूर असतो रागाला
मैफली मधे

दु:ख दायक काळ असतो रागाला
क्लेश दायक ताल असतो रागाला
भरकटणारा सूर असतो रागाला
जीवना मधे

एक मैफिल बसते रागाने
एक मैफिल जमते रागाने
एक मैफिल बिघडते रागाने
एक मैफिल उठते रागाने

मैफिलीत आळवावे लागते
जीवनात गोंजारावे लागते
फक्त रागाला..!

©शिवाजी सांगळे🦋
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

samiksha kalne

 :)खरच खूप छान कविता लिहिता ताई तुम्ही ..