CA Final

Started by @ "|" /\/\, August 23, 2019, 01:15:11 PM

Previous topic - Next topic

@ "|" /\/\

हो; मी नाहि झाले CA अजून.
दिवस सरले; खरं तर वर्ष सरले.
पण हो; मी नाहि झाले CA अजून.

अजून देखील आठवतात; शाळेतले ते दिवस;
नेहमी असायची खात्री; की मिळतिल टक्के भरभरून.
आणि आजचा हा निकालाचा दिवस;
जेव्हा कळतं; मी नाहि झाले CA अजून.

आठवत नाहि; केव्हा झाले होते CPT clear!
आठवत नाहि; केव्हा केलं IPCC clear!
आठवत ही नाहि; केव्हा संपले articleshipचे ते दिवस!
जेव्हा ठरवायचे; Final करेन एकच attempt मध्ये clear!

वाढदिवस आला की tension येतं;
जाणीव होते; वय वाढलं पण ऐपत नाहि वाढली अजून.
वाढदिवसाचा आनंद दूर; आणि जाते मी परत एकदा खचून.
कारण एकच; मी नाहि झाले CA अजून.

आता तर लग्न देखिल झालं;
पण संसाराला वेळ देताना डोक्यात सतत अभ्यासाचा विचार.
म्हणूनच होते सारखी चिडचिड; नाहि घेता येत संपूर्ण आनंद कशातून;
विचारात तेच; मी नाहि झाले CA अजून.

एकेकाळी बारावीत; कॉलेजातून पहिली आलेली पोरगी मी.
आई-बाबा; सर्वांच्याच खूप अपेक्षा माझ्याकडून.
पण आता depression येतं; इतर सवंगड्यांचे status updates बघून.
काही मित्र-मैत्रिणी तर इतर क्षेत्रात खूष आहेत; CA सोडून.
तरीही मला सूख मिळेल; माझ्या नावा आधि 'CA' हेच शब्द जोडून.
'CA अंशुली' हे status एक दिवस नक्की ठेवणार; हेच ठरवते मग मनातून.
ąȶɱ