साद बासरी

Started by शिवाजी सांगळे, August 23, 2019, 08:19:39 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

साद बासरी

साद घाली तुझी बासरी
पसरवी आनंद चराचरी
मधुर स्वर अविट असा
जातोय पाझरूनी अंतरी

वेडावते राधा अन् रानात
शहारे कालिंदी जळावरी
चौफेर भुलावी मोह वेडा
फुलं वेली, गाई गुरे सारी

वेणूनाद म्हणती तयाला
कुणी म्हणती साद पावरी
घुमत राहतोय युगे न् युगे
ध्यास कान्हाचा नित्य उरी

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९