आठवण

Started by AkSHay Pawase, August 25, 2019, 01:10:01 AM

Previous topic - Next topic

AkSHay Pawase

सुखः दुखः ने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते
कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते
सुखः हसण्याच्या रुपात तर दुखः अश्रूंच्या रुपात वाहते
पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्मरण असते
दुसर्यांचे पाहून केलेले अनुकरण असते
आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते
आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो
कारण छान जगण्या इतपत तरी आपण  शिकलेलो असतो.

25 ऑगस्ट 2015, 11.15
गोल्डन इरा 2013-15
अक्षय पावसे.