तुझे आणि माझे घर...!!

Started by vnvaidya, August 25, 2019, 03:13:31 AM

Previous topic - Next topic

vnvaidya

निळा समुद्र आणि हिरवा डोंगर जिथे आलिंगनाला उभा,
तिथे डौलात उभे तुझे आणि माझे घर ....
 
विश्वासाचे  अंगण आणि प्रेमाचें दार,
दाराबाजूने रुसव्या फुस्व्या दोन खिडक्या ,
क्रोध ही  जिथे हारून जिंके असे तूझे आणि माझें घर...
 
तू सहवास आणि स्वप्नांनी रचलेल्या विटां
आठवणींचे बनवून रंग , मायेनी सावरलेल्या भींती...
असे तूझे पण आता तुझे आणि माझे झालेले घर..
 
भीती पाेटी खिडक्या बंद नको जरा...
कारण काेंदड हवेला इथे मुळी न थारा...
सूर्य प्रकाशात लख्ख हाेऊन निघे तुझे आणि माझें घर....
 
विश्वासाच्या अंगणात आठवणींचा निशिगंध बागडताे
प्रेमाचा पारीजात जिथे स्वत:हुन तुळशीला पुजताे
असंच हे तूझे आणि माझें मंदीराहून शांत घर....
 
ह्या घराच्या पलीकडे आहे पृथ्वीवरील शेवटचा किनारा 
गुपीत हे उमगे मज तुझ्या मीठीत साक्ष देती चंद्र आणि वारा...
रात्रीने ही जिथे उजेड बघितला असे तूझे आनि माझें घर...
 
अंथूरुणावर जगाचा विसर पडून स्वत्वाची जाणीव येते
कधी न पडलेल्यां प्रश्नांचे उत्तर जीथे मिळते....
मनाचे शरीरास झाले मिलन असे तुझे आणि माझे घर...
 
ह्या घरात काही गोष्टींना मुळीच परवानगी नाही,
खाणा खुणा ,आदर, देव आणि वर्दानी
 
मंदिराचे ही पावीत्र्य जपेल,
असे तूझे आणि माझें जग...
फक्त आणि फक्त तूझे आणि माझें घर....!!

२७/०१/२०१९
©️ वैभव नारायणराव वैद्य.
मुक्काम पोस्ट सिलिकॉन व्याली.
वैभव नारायणराव वैद्य