फिरून येणे नाही

Started by शिवाजी सांगळे, August 26, 2019, 12:06:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फिरून येणे नाही

वाट चालत राहते, कुठे थांबणे नाही
वाटेत जगण्याच्या, मागे वळणे नाही

एकांत गूढ स्थळी, शोध तो स्वतःचा
सहज साध्य एवढे, कधी जमणे नाही

कसला अट्टाहास, सुखा शोधण्याचा
दु:खाची याचना, सहज मागणे नाही

भोवताली ठार, चक्राकार सुख दु:ख
फेऱ्यातून माघारी, योग्य पळणे नाही

भासती खुप सोपे, रम्य मरण सोहळे
जाता मरण पंथा, फिरून येणे नाही

© शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९