क्षणिक सुखाचे अत्तर

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 01, 2019, 10:40:18 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.क्षणिक सुखाचे अत्तर*

खुणावलेस का तू
मला दूर त्या रानात
तार छेडली प्रेमाची
स्वप्न रंगले मनात

झुळूक क्षणिक ती
विसावली उशाला
रात्रीची झोप उडाली
उगाच छेडलेस कशाला

तुझा माझा प्रेमरंग
दिला आभाळाने संग
तुझ्या नावाचा सखे
उडाला आभाळी पतंग

वेध लागले चंद्रास
त्या हिपेक्षा सुंदरतेचे
चांदण्यांनी दृष्ट काढली
क्षण संपले अंतरतेचे

विखुरले सुख सारे
जोडता जुडले नाही
क्षणिक सुखाचे अत्तर
ते ही आता पुरले नाही

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर