मंदी बदनाम झाली

Started by शिवाजी सांगळे, September 01, 2019, 01:48:48 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मंदी बदनाम झाली

मंदी आली बघा मंदी आली
सगळीकडे अशी बोंब झाली

खेडोपाडी बाजारी आणखी
शेतकऱ्यांकडे रुसून बसली

नाका आणि त्या टपरीवरती
नुकतीच सहज फिरून गेली

मॉल, हॉटेल अन् थेटरां मधे
शोधूनही कुठे ती ना दिसली

रेल्वे फुल एसटीगाड्या फुल
मंदी का कुठे फिरायाला गेली

म्हणती विमान उडवित मंदी
बघा परदेशी फिरायला गेली

नेमकी कमाल ती काय झाली
मुन्नी पेक्षा मंदी बदनाम झाली

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९