अनोळखी

Started by शिवाजी सांगळे, September 04, 2019, 12:17:23 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अनोळखी

शाश्वत न् अशाश्वत
खेळ सारे भास आभास,
झुल्यावर जाणीवांच्या
खेळवती साऱ्या जीवास !

सृष्टीच्या गर्भात या
अस्तित्व शोध स्वतःचा,
कणमात्र जीव येवढा
पसाराच हा जगण्याचा?

अजूनही अनोळखी
का असा मी स्वतःला?
शोध संपेना जीवनी
कसा ओळखू स्वतःला?

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९