माझं दुसरं प्रेम

Started by Lekh_swarga, September 05, 2019, 09:59:34 AM

Previous topic - Next topic

Lekh_swarga

पहिलं प्रेम जर जखम होत न ,
तर दुसर प्रेम मलम होतं ।
पहिल्या प्रेमाने जे दुःख दिले न ,
ते सर्व दुसऱ्या प्रेमाणी भरून दिले ।।

पहिल्या प्रेमात वय बालिक होत ,
समजूत फक्त नखभर आली होती ।
पण जेव्हा नजर भिडली माझी तिच्याशी ,
तेव्हा काही वेगळीच भावना आली होती ।।

पहिल्या प्रेमातून सुटका झाली होती ,
आता परत प्रेमात पडायचं न्हवत ।
पुन्हा कोणाला सोडून जाताना पाहून ,
परत एकदा रडायचं न्हवतं ।।

काहीच हालचाल न्हवती मनात ,
अतिशय शांतता होती जीवनात ।
वाटतं होतं काहीतरी वेगळं होणार आहे ,
शांततेनंतर जीवनात परत भूकंम्प येणार आहे ।।

हृदयाचे ठोके जोरात झाले होते ,
कारण प्रेम जीवनात परत आले होते ।
विचारांनी कामावरून रजा घेतली होती ,
आणि मी परत प्रेमाची सजा घेतली होती  ।।

आगमन झाले होते मोहतरमेचे ,
रूप थोडे सावळे होते तिचे ।
उंची जवळपास होती 5 फूट 2 इंच ,
आणि केस बऱ्यापैकी काळे होते तिचे ।।

पाहता तिला पहिल्याच नजरेला ,
"Love at first sight"वर विश्वास आला होता ।
तिच्या टोकदार डोळ्यांच्या बाणांनी ,
माझ्या हृदयाचा क्षनातच विनाश झाला होता ।।

तिच्या रूपाचे वर्णन करता , जसे
जिवंतपणी स्वर्गच लाभले होते ।
अप्सरेच्या त्या देखण्या रूपाला पाहून ,
हृदयाचे ओरडणे सुरू झाले होते ।।

एके दिवशी "सबर का फल मीठा होता है",
ह्या म्हणीचा चा अर्थ खरा वाटला होता ।
ऐकून तिचे मधुर व गोड बोल ,
मला तिच्यातील प्रेमसाथी पटला होता ।।

आठवते मला अजूनही आमचे ते ,
एक एक तास फोन वर बोलणं ।
आठवते मला अजूनही तिचं ते,
मोरणीसारखं सुंदर चालणं ।।

विचारांची तर अदलाबदल झाली होती ,
पण हृदयाची अजून राहिली होती ।
मी तर माझे हृदय तिला Parcel केले होते ,
पण तिचे प्रेमाचे Mail अजून मला आले न्हवते ।।

माझ्या हृदयाची Friend request  ,
अजूनही तिने accept केली न्हवती ।
कारण मला नंतर माहीत पडल की ,
तिची friend list तर आधीच भरली होती ।।

माझं हृदय तर तिच्या मागे होत ,
पण तिचं हृदय कोणा दुसऱ्यात अडलं होतं ।
विचारायचं होतं तिला सर्व स्पष्ट स्पष्ट ,
पण सालं हे मन काहीच बोलत न्हवतं ।।

विचारायचो तिला "करते न प्रेम माझ्याशी",
तर स्पष्ट हो म्हणून उत्तर द्यायची ।
पण दुसऱ्यात तिचे मन अडकल्यानी ,
खोटं बोलून लवकरच पळून जायची ।।

प्रेमाच्या ह्या भुलभुलयेनी ,
खुप घुमवल मला तिच्या शोधात ।
पण कमजोर अश्या ह्या प्रेमानी ,
एकटच सोडलं मला मधात ।।

चिडलो होतो मी ,रागावलो पण होतो ,
प्रयत्न केला ठेवण्याचा तिच्यावर पहारा ।
पण तिने माझं प्रेम नाकारण्यासाठी ,
घेतला डायरेक्ट राखीचाच सहारा ।।

प्रेमाच्या ह्या स्टोरीचा एन्ड करण्यासाठी ,
बांधली राखी तिनी माझ्या हाताला ।
शेवटी दादाच बनवून टाकलं मला ,
आणि विराम लावला ह्या प्रेमगाथेला ।।

Thank you ! धन्यवाद ! शुक्रिया !
:-*

Yogesh9889