शेवटच्या क्षणी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 08, 2019, 11:19:27 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.शेवटच्या क्षणी*

शेवटच्या क्षणी तू हवी शेजारी बसायला
दुर्लक्ष केलंस वाटलं प्रेम लागलं रुसायला

कधी कधी सुख दुःख वाटेला आले जरा
तर कधी आठवांचे वारे लागले पिसायला

दुरावा इतका वाढतं गेला की संपल सारं
प्रेमात विरहाचे गाव लागले दिसायला

शंका विचारल्या नाही कोणी कोणास
आपलेच दात होते ते लागले डसायला

नवं नवे प्रेमाचे आखले होते डाव मी
आखलेले आपलेच डाव लागले पुसायला

काजळ लपवत होतं आसवांच गाऱ्हाणं
गाऱ्हाणं लपवतां स्वप्नं लागले फसायला

रोज भेटणारे आले होते मयतीला माझ्या
एक खंत राहिली तू होते तिथे असायला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर