जरा विचार कर !

Started by Engineer Ramesh Kharad, September 08, 2019, 08:52:46 PM

Previous topic - Next topic

Engineer Ramesh Kharad

जरा विचार कर !

भावनांशी नको खेळूस माझ्या
नको अशी बघूस प्रेमाची परीक्षा माझ्या
कर काहीतरी टाक पाउल पुढचं घे निर्णय एकदाचा
हो तू माझी आणी होऊदे मला तुझा
तुला दुखी पाहिलं कि मन माझं  दुखी होतं
जरा विचार कर ,तुला बघून  कोणीतरी जगत होतं ...


तुझं माझं प्रेम म्हणजे एक अवघड कोढ
उत्तर आहे अवघड पण आहे खूप थोडं
नको अशी खाउस मनातल्या मनात स्वतः ला
घेऊ दे दु:ख  तुझ्या वाट्याचे थोडे मला
भेट एकान्तात कधी तरी तू मला
खूप काही सांगायचे आहे तुला
जरा विचार कर तुझ्या प्रेमाची चाहूल लागली आहे कोणाला ...

प्रेमाने दोन शब्द बोल एकदा तू मला
सर्व हकीकत मग सांगेल मी तुला
तुझ्या मनाच्या स्थितीची आहे मला जाणीव
पण तुझ्या माझ्या प्रेमात नाही कोणतीच उणीव
तुला बघितलं कि कोणीतरी खोल विचारात पडतंय
जरा विचार कर,तुझ्या विचाराचा कोणीतरी विचार करतय ....


असं वाटत मनात तुझ्या शिरून मनाला तुझ्या जाणून घ्यावं
दु:खला  तुझ्या दूर न्यावं ,तुला सुखात ठेवावं
तुझ्या प्रेमात विसरून जावं सा-या  जगाला
आपलंस कराव फक्त तुला
असावं या जगात आपलसं कोणीतरी
जरा विचार कर ,तुझ्या हृदयाचे ठोके मोजताय कोणीतरी ...."

                                           : रमेश  खराद(9172041244)

Jitendra Rathod

YE Chhore kya Dard Hai Tere Sineme.........nice Poet

परी चा श्रेयस

[अशी होती माझी परी

अशी होती माझी परी
सोतहा जगणारी आणि मला जपणारी

प्रेम खूप करायची ती
रागवत पण होती आणि
प्रेमानं मारत पण होती
:( :( :( :( :( :(


साधी सिंपल राहत होती ती
तिला मी कसाही असू खूप आवडायंचो
काळजात घर करून ती मला ठेवायची
:'( :'(  :'( :'( :'( :'(

छोटस नाक आणि त्या नाकावर खूप राग
नाजूक डोळे :'( आणि तिची ती कातील नजर
आणि तिची मला निरखून पाहण्याची ती सवय

अशी होती माझी परी
माझ्या मनाला आग लावणारी
:( :( :( :( :( :( :( :( :(
आता नाही राहिली गेली देवा घरी

परी चा श्रेयस
औरंगाबाद महाराष्ट्र
7218013826


परी चा श्रेयस

खूप आठवण येते ग तुझी
खूप रडतो मी

बघ ना देवाला पण मान्य नव्हती आपली प्रेम कथा
कोणाला सांगू आपल्या दुःखाची  व्यथा

जीव लावणारी तू देवाने तुला पण घेतले हिसकावून
कसा राहू ग परी मी करमत नाही न मला

खूप आठवण येते ग तुझी
खूप रडतो मी
तुझी आठवण येते ग धाऊन
काय करणार तो वेळही होता दात खाऊन
गेला तो मला दुःख देऊन

खूप आठवण येते ग तुझी
खूप रडतो मी


Gaurav Shinde

ओठातल बोलला रे भावा माझ्या