इच्छा तुझी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 09, 2019, 11:11:07 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.इच्छा तुझी*

नाही समजलेच काही तर तक्रार कर तू
तुझ्यामुळे मरणार याचा सत्कार कर तू

प्रेमासाठी सांडले आहे रक्त माझे जरी
रक्त तुझे नाव घेईल याचा विचार कर तू

सांग कधी वागलो खोटा मी तुझ्याशी
वागलो तर वाटेल तेव्हा तिरस्कार कर तू

लोक काय म्हणतील म्हणून सोडलंस तू
आता तुझ्या विरहाचे तीर आरपार कर तू

मला आहे माहीत तू श्रीमंत घरची आहेस
हिंमत करून श्रीमंतीची हद्द पार कर तू

कळेल का कोणता शाप दिलास मला तू
एक काम कर मरणासाठी लाचार कर तू

इच्छा तुझी पूर्ण झाली सरण सजले माझे
अग्नीदाह देण्यास थोडासा अंधार कर तू

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर