पाण्याचा तो झरा....

Started by Rushi.VilasRao, September 10, 2019, 08:47:21 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

आज माणसाची माणुसकी किंवा माणसाची वृत्ती प्रवृत्ती ही जातीयतेच्या हल्ल्यात अडकत चालली आहे... खालील आर्टिकल मध्ये माणसाच्या माणुसकीला किंवा आज समाजात असलेल्या परिस्थितीला पाण्याच्या झऱ्याचे उपमा दिलेली आहे....


पाण्याचा तो झरा...
पाण्याचा तो झरा जाने दिशा बदलली त्याच्या प्रवाहाची...
प्रवाह त्याच्या पाण्याचा निर्मळ आणि निखळ होता...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
प्रवाह त्या पाण्याचा समानतेच्या वाटेवरचा होता.... सर्वांसोबत मिळून-मिसळून कधी संथ निवांत तर कधी उल्हासाने भरती आल्याप्रमाणे वाहत होता... अचानक एकदा मार्ग बदलला त्या प्रवाहाने...
मार्ग बदलला त्या पाण्याच्या झाऱ्याने...
जो कधीकाळी सर्वांसाठी समान होता...
पाण्याचा तो झरा कधी शांत होईल का नाही???. पाण्याचा तो प्रवाह सापडला जातीयतेच्या हल्ल्यात....
पाण्याचा तो प्रवाह जो अडकला एकमेकांना तुच्छ लेखण्यात...
ते पाणी जे अडकले एकमेकांना पाण्यात पाहण्यात....
आज ते पाणीच समानतेची वाट विसरून गेलं... जातीयतेच्या हल्ल्यात एकमेकांना ओढून घेत गेलं....
ज्याची जशी जात त्याला तस आवडून निवडून घेत गेलं....
आज तो समानतेच्या पाण्याचा प्रवाह जातीयतेच्या हल्ल्यात अडकत गेला....
आज प्रश्न पडला त्या समानतेच्या वाटेच्या दिशा दर्शकांना....
कधी बदलेल का तो झरा त्याच्या या  अ-समानतेच्या दिशेला....
वाहील का पुन्हा कधी त्याच्या जुन्या निर्मळ आणि निखळ समानतेच्या दिशेला.....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan