जरा मी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 13, 2019, 11:46:39 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक. जरा मी*

तू पाहिलं प्रेम समजलो चुकलोच जरा मी
खोटे सोबतीला असता थबकलोच जरा मी

गाव सारं गोळा झालं दुष्मनी माझी पहायला
नरडीचा घोट घेतला अन संपलोच जरा मी

घोट नरडीचा घेणारे रक्तातले माझे ते होते
अडवले कोणी हे पाहून का रडलोच जरा मी

खाणारे एक गाणारे एक माझ्या सोबतीला
भरवून देणाऱ्याच ऐकलं भांडलोच जरा मी

झाले एकत्र जे माझ्या सोबतीला होते कधी
मतलब भागलं त्यांचं अन गाजलोच जरा मी

वाट माझी होती सरळ साधी जगतांना जरी
आपले दुःख घेऊन सोबती नडलोच जरा मी

मेलो जरी कधी हसणार हे आधी पाहून मला
यांच्यासाठी जगतांना कसा पडलोच जरा मी

श्वासातला देव ही समजलो रोज मी ज्याला
श्वास रोखून गळा दाबला अन मेलोच जरा मी

शोधू शेवटी खांदा देणारे मयतीला माझ्या
जिवंत माझे मढे पाण्यात सोडतोच जरा मी

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर