सारे विरोधात गेले

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 14, 2019, 09:04:43 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.सारे विरोधात गेले*

तुटलेलं काळीज जोडणारे सारे विरोधात गेले
गुदगुल्या करून हसवणारे सारे विरोधात गेले

निवडणूक लढवली नाही मी राजकारणाची
रोजचे जवळून जाणारे सारे विरोधात गेले

काळजाची जखम ती ओली झाली अन
जीव ओवाळून टाकणारे सारे विरोधात गेले

देवा का विरोध तुझा माझ्या भक्तीला झाला
सोबत पूजा करणारे सारे विरोधात गेले

काय गुन्हा झाला माझा खरे बोललो मी
मायेचा हात फिरवणारे सारे विरोधात गेले

पहावं म्हणलं आज सत्य वागून जरासे
जहालं खोटं पचवणारे सारे विरोधात गेले

वागले का माझ्याशी असे कळले नाही कधी
आज का मला घडवणारे सारे विरोधात गेले

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर