स्वप्नातील तू

Started by ujwal deshmukh, September 16, 2019, 08:02:22 PM

Previous topic - Next topic

ujwal deshmukh

स्वप्नात रोज येतेस
जीवनात सुद्धा यावे
फुलवूनी माझा संसार
स्वर्ग बांधून द्यावे  .....

फुले हि कोमेजतील 
सभोवतालची तुला बघून
इर्षेने दडून बसेल चंद्र
ढगांमध्ये तुला पाहून .....

दुःखाला लाथ मारून
सुखहि  दारात बसेल 
बघून साथ आपला
राधाकृष्णही हेवा करेल  .......

वचन देतो तुला
साक्षी ठेवून हे तारे
नाही तुटणार नाळ
सात जन्म वाहील हे वारे ....

घडवून जीवनाचे शिल्प
शिल्पकार तू व्हावे
देण्यास तुझा परीसस्पर्श
स्वप्नामधून बाहेर यावे ......

       .....उज्वल देशमुख ...