उपकार पावसाचे

Started by ujwal deshmukh, September 17, 2019, 01:58:27 PM

Previous topic - Next topic

ujwal deshmukh

अश्रुसोबत आला पाऊस
ओले चिंब करून गेला
खळखळनार्या पाण्यामध्ये
रडण्याचा आवाज दबून गेला...........

    नाही कळले कुणाला
    येवढा पूर कसा आला
    माझ्या मनावरील ओझे     
    सोबत वाहत घेवून गेला .......

वाहून गेले पाणी
रस्ते हि मोकळे झाले
मळलेले मन हे माझे
त्यानेच स्वच्छ केले  ...........
     
     अश्रुभरल्या डोळ्यांनी
     आभार मानिले पावसाचे
     ना कळू दिले दुःख त्याने
     इतरांना माझ्या मनाचे .........

चकाकणारी सूर्यकिरणे
दवबिंदूतून परावर्तीली
फुलवाया  मन माझे
माझ्या पर्यंत पोहोचली .......

           उज्वल देशमुख 9860011632